जन्माला येताक्षणी बाळानं नर्सला विचारलं," एक्स्क्युज मी! मोबाईल आहे का तुमच्याकडे?
" आहे रे बाळा! पण तुला कशाला हवाय?"
" मी सुखरुप पोहोचलोय म्हणून देवबाप्पाला मिस्ड कॉल द्यायला!!! "
आवडलेले मराठी कथा , कविता , विनोद अणि लेख ...
जन्माला येताक्षणी बाळानं नर्सला विचारलं," एक्स्क्युज मी! मोबाईल आहे का तुमच्याकडे?
" आहे रे बाळा! पण तुला कशाला हवाय?"
" मी सुखरुप पोहोचलोय म्हणून देवबाप्पाला मिस्ड कॉल द्यायला!!! "
Posted by
संजय वानखेडे | Sanjay wankhede
at
1:28 AM
0
comments
ती. बाबा आणि सौ . आईस,
बंड्याचा शि. सा.न.वि.वि.
मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप येऊन पोहोचलो. तुम्ही लगोलग मला बाईक घेऊन दिल्यामुळे माझी कॉलेजला आणि क्लासला जाण्याची मस्त सोय झालीय बरं का ! पुण्यात बाईक चालवायला जबरी मजा येते.
पुणेकरांचे आवडीचे पूर्वीचे वाहन म्हणजे सायकल . आपल्या गावात देवाला सोडलेल्या रेड्याला जसे कोणीही काहीही करत नाहीत, तसेच इथे सायकलस्वारांना कोणताही नियम लागू नाही . पोलिसांची नजर चुकवून आणि शिट्टीचा इशारा ऐकून न ऐकल्यासारखे करून हे झक्कासपैकी पसार होतात. काय करणार ! सध्याचे लाइफच धावपळीचे झाले आहे . त्यांचा दोष कसा गं म्हणता येईल आई?
इथल्या दुचाकीचालकांना ऊर्जाबचतीचे महत्त्व खूपच पटले आहे . त्यांच्या वाहनावरसुद्धा तीन जण आरामात बसतात. सिग्नलपाशी लाल दिवा असला तरी ते सहसा थांबत नाहीत ; कारण त्यामुळे पेट्रोल जास्त जळते. मी कुठेसे वाचले , की वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे. म्हणून हात दाखवायचे कष्ट कोणी घेत नाहीत. शिवाय हात दाखवून अवलक्षण करू नये म्हणतात. त्यामुळेच की काय काही रिक्षाचालक पायाने वळण्याचा इशारा करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत? शाळांचे रिक्षावाले काका खूप प्रेमळ असतात. रिक्षात १२- १५ मुले घेऊन ते मायेची भूक कशीबशी भागवितात. आई, पुणेकर फार लठ्ठहोऊलागलेत असा अहवाल मध्यंतरी तू वाचला असशीलच. त्यावर उपाय म्हणून रिक्षावाले फक्त लांब अंतरावरचे प्रवासी स्वीकारतात. बसचालकांनाही पुणेकरांच्या लठ्ठपणाची खूप काळजी वाटते. त्यामुळे ते स्टॉपच्या अलीकडे किंवा पलीकडेच बस थांबवितात.
बाबा, येथील वाहतूक पोलिस पर्यावरणाबाबत सजग आहेत. एक कागद बनविण्यासाठी अनेक झाडे तोडावी लागतात. त्यामुळे नियम तोडणाऱ्याला कागदाची पावती फाडून दंड करणे ते गुन्हाच समजतात . मध्यंतरीच्या वादामुळे मोटारचालकांचा "लेन' या शब्दावर खूप राग आहे . "लेनची शिस्त पाळा' असा फलक वाचला , की ते हटकून ती सूचना धुडकावतात . बाबा, दुसरी आनंदाची बातमी म्हणजे मला लायसन्स अगदी होस्टेलपोच मिळाले . कसे ते मात्र गावाला आलो की सांगेन !
(ता .क. - बंटीला मोकळ्या मैदानात सायकल शिकवू नका. मे महिन्यात मी त्याला कर्वे रस्त्यावर दोन दिवसांत शिकवेन)
तुमचा लाडका
बंड्या
Posted by
संजय वानखेडे | Sanjay wankhede
at
12:20 AM
0
comments
ती मुलगी मराठि असते ...
company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
company मध्ये मुली short top घालतात .
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते , ती मुलगी मराठी असते .
company मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते ती मुलगी मराठी असते !!!!!!
तो मुलगा मराठि असतो ...
ओर्कुट वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना स्क्रप मधेय (प्रेमाने)शिवी घालुन, मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो , तो मुलगा मराठी असतो...
ओनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...
मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarassing वाटेल असे कही FWD करत नाही, तो मुलगा मराठी असतो...
चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I Respect your Privacy'म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...
Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,
पण जो 'Whts Real,Virtual ?..Friends Are Forever'असे म्हणतो, तो मुलगा मराठी असतो...
Posted by
संजय वानखेडे | Sanjay wankhede
at
6:04 AM
1 comments